सगळीकडून आरडाओरडा

आणि कामाचे प्रेशर

असताना हसमुख राहणारा

अवलिया म्हणजे मुकादम.☺️

 

माननीय आणि वरिष्ठांची बोलणी

खाऊन त्याकडे दुर्लक्ष

करत हसत काम करणारा

अवलिया म्हणजे मुकादम.😀

 

सर्व कर्मचाऱ्यांचे दुःख

जाणून अडचणीच्या वेळी

त्यांना समजून घेणारा

अवलिया म्हणजे मुकादम.🤗

 

गोड बोलून सर्वांकडून काम करून

घेणारा आणि चांगले काम केले

म्हणून त्यांचे कौतुक करणारा

अवलिया म्हणजे मुकादम.☺️

 

कामाच्या ओढतानीत पण

स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व

आणि स्वाभिमान जपणारा

अवलिया म्हणजे मुकादम.🥰

 

मी पण तुमच्यातीलच एक आहे

असे भासावणारा आणि

सर्वांना खळखळून हसवणारा

अवलिया म्हणजे मुकादम.🤗

– प्रेमा