काय करू आम्हाला क्षणा क्षणाला तुमची आठवण येत आहे,

तुमच्याच बाबतीत हे का घडलं म्हणून काळीज पिळवटून जात आहे.😔

 

हसत खेळत असणाऱ्या घराला कोणाची नजर लागली आहे,

होत्याचं नव्हतं झालं म्हणून मन भरून येत आहे.😔

 

कोणतीही वस्तू हातात घेऊ दे तुमचा चेहरा समोर येत आहे,

मागच्या वर्षीचा आजचा दिवस आठवून डोकं बंद होत आहे.😔

 

तुमचा तो केविलवाणा चेहरा नजरे समोर येत आहे,

जगण्यातील ती धडपड परत परत आठवत आहे.😔

 

काय करू मॉम आज आम्हाला खूप बेचैन होत आहे,

अजूनही तुम्ही आमच्या जवळ आहात असच वाटत आहे.😔

 

तुम्ही आहात तिथे आनंदी राहावे हे मनोमन प्रार्थना आहे,

आमच्या मॉम आमच्यात परत याव्यात हीच एक इच्छा आहे.😔

– प्रेमा