मुलगी जन्माला आल्यावर ज्याच्या आनंदाला पारावारा उरत नसतो,

त्याच वेळी मुलीला खूप मोठे करायचे तो मनोमन ठरवत असतो.

आई प्रमाणे सगळे लाड पुरवणे तो न थकता करत असतो,

हे करताना तो बापाचे कर्तव्य कधीच विसरत नसतो.

मुलीस लहानाचे मोठे करताना खूप खस्ता खातो,

तिचे लाड पुरवण्यासाठी दिवस रात्र जागतो.

तिला जगातील सर्व सुख मिळावे म्हणून तप्तर राहतो,

तिच्या आनंदासाठी सगळं काही तो करतो.

असा हा बाप आपल्या लेकीचा खूप लाडका आहे,

आणि लेक आपल्या बापाची खूप लाडकी आहे,

हे सर्व लोकांना फक्त मुलीच्या पाठवणी वेळी कळत असते.

                                                                    – प्रेमा