तुझं ते रोज रुसणं आणि माझं तुला रोज मनवणं
ही मैत्री आहे की अजुन काही!☺️
कोणी मला बोललं की तुझ्या मनाला लागणं
आणि तू दुःखी होणं
ही मैत्री आहे की अजुन काही!☺️
तुझ्या मनातलं वादळ शब्दावाटे बाहेर येणं
आणि ते मी गप्पावाटे क्षमवणं
ही मैत्री आहे की अजुन काही !☺️
तुझं ते दुःख बाहेर पडण्यासाठी तू धाय मोकलून रडणं
आणि त्यावर मी शब्द सुमनांची फुंकर घालणं
ही मैत्री आहे की अजुन काही !☺️
मी थोडावेळ जरी नजरेआड झाले तरी तुझं ते अस्वस्त होणं
आणि माझं तुला समजावणं
ही मैत्री आहे की अजुन काही !☺️
प्रेमा
November 21, 2021 at 8:26 am
छानच छानच छानच….👍👍👍
November 21, 2021 at 8:33 am
धन्यवाद दादा.🙏😊
November 21, 2021 at 8:35 am
He agadi nakki, pakkam pakka ajun kahi ahe.
November 21, 2021 at 9:28 am
धन्यवाद ताई.🙏😀