जगणे तू भावना मी
श्वास तू जीवन मी..☺️
जग तू संसार मी
शब्द तू गीत मी..😍
वटवृक्ष तू छाया मी
ग्रीष्म तू वर्षा मी..☺️
प्रेम तू प्रीती मी
पाणी तू अग्नी मी..🥰
जपणे तू वादळ मी
सागर तू लाटा मी..☺️
शांत तू खोडकर मी
समंजस तू रुसवा मी..😘
घर तू गजबज मी
दिवा तू पणती मी..☺️
हिच असेल आपल्या प्रेमाची हमी…🤩🥰
– प्रेमा