दिवस येतो आणि जातो तसे मनातील चढउतारांना पण समजून घेतलचं पाहिजे , आता मला जगलचं पाहिजे.🌞

जिवाचं रान करून मला वाढवणारे माझे आई वडील यांचा मान राखलाचं पाहिजे, आता मला जगलचं पाहिजे.😚

अडचणीतून मार्ग काढून पुढे जाणाऱ्या लोकांचा आदर्श घेतलाचं पाहिजे, आता मला जगलचं पाहिजे.🙏

आजूबाजूच्या दुःखी मनांना थोडं सुखी केलचं पाहिजे, आता मला जगलचं पाहिजे.☺️

हे ही दिवस जातील असे मनाशी पक्क केलचं पाहिजे, आता मला जगलचं पाहिजे.🙂

आयुष्य हे एकदाच मिळतं याचं भान ठेवलचं पाहिजे आता मला जगलचं पाहिजे.🤞
– प्रेेमा