आभासी जगतातही भासी वाटेल अशी मैत्री तुझी माझी.
लांब असूनही जवळ भासेल अशी मैत्री तुझी माझी..

न पाहताही विश्वास बसेल अशी मैत्री तुझी माझी.
सुख सांगून तर दुःख सगळे बोलण्यातून मिटेल अशी मैत्री तुझी माझी..

न बोलताही मनातील भाव कळेल अशी मैत्री तुझी माझी.
सुख दुःखात साथ असेल अशी मैत्री तुझी माझी..

जीवनातील कोणत्याही क्षणी सोबत असेल अशी मैत्री तुझी माझी.
प्रत्यक्ष नात्याला लाजवेल अशी अप्रत्यक्ष मैत्री तुझी माझी..
– प्रेमा