प्रजासत्ताक दिन आला की मी अलगद बालपणीच्या आठवणीत रमून जाते,
त्यावेळेस केलेल्या धमाल मस्तीची अचानक आठवण येते.🇮🇳
पूर्वसंध्येला प्रजासत्ताकची पूर्ण तयारी करताना धांदल उडायची,
रात्री उशिरापर्यंत जागून पण सकाळी लवकर उठण्यात भारी मज्जा यायची.🇮🇳
शाळेच्या मैदानवर होणारे संचालन खूप भारी वाटायचे,
प्रभातफेरी निघाली की आपापले मित्र मैत्रिणी गाठायचे.🇮🇳
प्रभातफेरी वेळी देशावर घोषणा देणे हा आमचा आवडता कार्यक्रम असायचा,
रस्त्यावरून जाताना प्रत्येक घरासमोर काढलेली रांगोळी आणि देशभक्तीपर गीत हे आपल्या स्वागतासाठी आहे असं वाटायचं.🇮🇳
स्काऊटगाईड, एमसीसीमध्ये भाग घेऊन झेंड्याला मानवंदना द्यायची,
हे करताना आपणच सीमेवर उभे आहोत असा फिल यायचा.🇮🇳
प्रजासत्ताक दिनी मैदानावर होणारे मल्लखांब, टिपऱ्या, लेझिम, झांज यासारखे विविध कार्यक्रम खूप छान असायचे,
तहान भूक हारून आणि उन्हात उभे राहून सगळे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे.🇮🇳
असा आमचा अनोखा प्रजासत्ताक दिन मला नेहमीच आठवतो
आणि त्याच जुन्या पण नवीन भासाव्या अशा आठवणी तो मनी जागवतो.🇮🇳
🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
– प्रेमा
January 26, 2022 at 4:15 am
अगदी बरोबर…. शाळेत असताना आम्हीही हे सर्व केलंय… खूप धमाल यायची 😃😃👍
January 26, 2022 at 4:32 am
हो ना?😊
धन्यवाद!🙏😊