लहान मुलांचं जीवन किती स्वच्छंदी असते
भविष्याची त्यांना कसलीच तमा नसते.😃
येतात अनेक विचार त्यांच्या मनात
न घाबरता बोलतात अगदी जोमात.😃
मनात नसते कोण काय म्हणेल याची भीती
छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद लुटतात किती.😃
समाज, धर्म आणि जात असते यांच्यापासून खूप दूर
सर्वांमध्ये मिसळून खेळायचे सुख मिळते त्यांना भरपूर.😃
पाहून त्यांचा निरागस आणि हसरा चेहरा
तुम्हा आम्हा लोकांना आनंद होतो गहरा.😀
– प्रेमा
Leave a Reply