तू असचं अल्लड वागून
परत एकदा माझ्या
डोक्यात जाऊ नकोस.🙄
रागाच्या भरात विचार करून
तुलाच जास्त त्रास होईल
असं परत एकदा वागू नकोस.🙄
स्वतःचचं खरं करण्याच्या
नादात आपली ही मैत्री
परत एकदा गमावू नकोस.🙄
तुझ्या या हट्टीपणाला कंटाळून
मी दूर जात आहे; म्हणून नशिबाला
परत एकदा दोष देऊ नकोस.🙄
मैत्रीचं नातं म्हणजे कष्टाने कमावलेला
असा एक नाजूक धागा असतो
त्याला परत एकदा विसरू नकोस.🙄
नातं टिकवायची जबाबदारी ही दोघांची
म्हणून तुला सांगणे की, आपल्या मैत्रीचा
अंत असा परत एकदा पाहू नकोस.🙄
– प्रेमा
March 5, 2022 at 9:14 am
जोडीदाराची विविध रूपं… खूप सुंदर… 👍👍👍
March 6, 2022 at 5:35 am
ती कविता आज पोस्ट होईल दादा.🙏😄
March 5, 2022 at 9:39 am
Wah bhai wah dosti/pyar ek hi hai.
March 6, 2022 at 5:36 am
Thank you Tai.🙏😊
March 5, 2022 at 10:17 am
Atishay Sundar..super👌
March 6, 2022 at 5:36 am
Thank you.🙏😊
March 5, 2022 at 10:28 am
खुप छान
March 6, 2022 at 5:37 am
धन्यवाद ताई.🙏😊