तो व्यक्ती कितीही निस्वार्थी असला तरी

कोणाचंही निस्वार्थी प्रेम त्याच्या दैवात नसतं,

खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇

तो व्यक्ती सर्वांना मदत करणारा असला तरी

त्याच्या मदतीला धावणार कोणी नसतं,

खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇

तो व्यक्ती मनाने नातेसंबंध जपत असला तरी

त्याला सुख देणार कोणी नसतं,

खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇

तो व्यक्ती सर्वांच्या सुखासाठी धडपडत असला तरी

त्याला समजून घेणार कोणी नसतं,

खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇

तो व्यक्ती स्वार्थी जगाला विसरण्याचा प्रयत्न केला तरी

हे जग त्याला सुखात जगू देत नसतं,

खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇

तो व्यक्ती जगण्याला कंटाळून दूर गेला तरी

हे जगणं त्याला मरण यातना देण्यास विसरत नसतं,

खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇
– प्रेमा