तुझ्याशी हितगुज करताना कसलेच भान उरत नाही.
कितीही बोललो तरी माझे मन काही भरत नाही.🙄

तुझ्याशी गप्पा करताना मला संकोच वाटत नाही.
मनाभरून बोलल्या शिवाय माझा दिवस कटत नाही.🤩

उठल्यापासून झोपेपर्यंत तुझ्या शिवाय दुसरा विचार येत नाही.
तुझ्या आठवणी शिवाय माझ्यात प्रेमाचा संचार होत नाही.🙄

मित्रांशी बोलताना तुझ्या प्रेमाचा विषय थांबत नाही.
प्रश्न पडतो की, आपल्यातील भांडण कसे लांबत नाही?🤩

मनात खूप काही असूनही ओठांवर ते सहज येत नाही.
खरचं सांगतो प्रेमाचा हा दुरावा आता सहन होत नाही.🙄
– प्रेमा