तुमच्या सुखात सहभागी
होणारे सगळे असतात;
पण जो तुमच्या दुःखात
पण सहभागी होईल,
त्या व्यक्तीच्या मैत्रीला
नक्की जपले पाहिजे.😊

तुमच्या उभरत्या काळात
सगळे सोबत असतील;
पण जो तुमच्या पडत्या
काळात पण सोबत असेल,
त्या व्यक्तीच्या मैत्रीला
नक्की जपले पाहिजे.😊

तुमच्या कोणत्याही हो मध्ये हो
मिळवणारे सगळे असतात;
पण जो तुमच्या चुका सुधारून
तुम्हाला योग्य मार्गावर नेईल,
त्या व्यक्तीच्या मैत्रीला
नक्की जपले पाहिजे.😊

तुमचा आनंद उपभोगण्यासाठी
सगळे सोबत असतील;
पण जो तुमच्या मनाला
जपण्यासाठी सोबत असेल,
त्या व्यक्तीच्या मैत्रीला
नक्की जपले पाहिजे.😊

तुमच्या आयुष्यातील
काळोख दूर सारून,
तुमच्या जीवनात आनंद
आणि प्रेम घेऊन येईल,
त्या व्यक्तीच्या मैत्रीला
नक्की जपले पाहिजे.😊
– प्रेमा