तुझं माझं नातं तू खूप वेगळं जपतोस
मी तुझ्यासाठी खूप स्पेशल असल्याचे
तू बोलण्या पेक्षा जास्त कृतीतून दाखवतोस.🤩

तुझं माझं प्रेम मनापासुन निभवतोस
फक्त आणि फक्त माझाच असल्याची
जाणीव तू विश्वासातून करुन देतोस.🤩

बॉयफ्रेंड असतानाचा तू आत्ताही तसाच भासतोस
जोडीदार म्हणून कोणतेही वेगळेपण न दाखवता
पूर्वी वागत होतास तसाच आत्ताही वागतोस.🤩

तुझ्या शांत स्वभावाप्रमाणे प्रेम व्यक्त करतोस
कसलीही जबरदस्ती किंवा अतताईपणा
न करता प्रेम अनुभवून मनोमन खुश होतोस.🤩

कधी कधी प्रेमाच्या मनाचा हळूच ठाव घेतोस.
तुझी सखी खूप समजूतदारपणे वागते या
प्रेमाच्या भावनेने तू मनोमन सुखावतोस.🤩

त्रास झाला मला तर तू दुःखी होतोस
तू फक्त माझा जोडीदार नाहीस तर पहिला
माझा बेस्ट फ्रेंड असल्याची जाणीव करून देतोस.🤩
– प्रेमा