निवडणूक म्हटले की राजकारणी लोकांच्या
धावपळीचा काळ आणि मन खट्टू झाल्याने
त्या काळात सर्वसामान्यांना आठवते ते बटण नोटा.🙏

मतदानाच्या काळात आठवण येते म्हणून
मतदार राजाच्या पाया पडून निवडून येत
नेते मंडळी सगळीकडे मिरवतात घालून फेटा.🙏

एकदा निवडून आले की हे नेते लोकं
अजिबात ढुंकून न पाहता सर्वसामान्यांना
पुढील पाच वर्षांसाठी देतात हळूच फाटा.🙏

खूप कमी राजकारणी लोकं जनता जनार्धन
म्हणून प्रामाणिकपणे काम करून मिळवतात
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रेमाचा भरपूर साठा.🙏

धकाधकीच्या जीवनात भरीस भर म्हणून
बेकारी, वाढती महागाई आणि शहर विद्रुपीकरण
पाहून सर्वसामान्यांच्या अंगावर येत आहे काटा.🙏

सगळीकडून त्रासाचा भडिमार सोसून
कंटाळली ही जनता, खरंच थांबाव्यात आता वाईट
राजकारण, दुष्काळ, युद्ध आणि कोरोनाच्या लाटा.🙏

सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या
राजकारण्यांना त्याची कीव न येता म्हणती आता
परत तुम्ही आम्हाला पुढील पाच वर्षांनी निवांत भेटा.🙏

सुजाण जनतेला एक विनंती आहे की, येत्या
निवडणूकीत करून या सगळ्यांना टाटा,
मतदानाच्या अधिकाराने लालची नेत्यांच्या माना छाटा.🙏
– प्रेमा