तू बोलून जेवढं छळतोस त्यापेक्षा

तुझा अबोला मला जास्त छळतो,

खूप बोलायचे असूनही मग

तू माझ्याशी बोलणे टाळतो?🙄

 

हे जीवन क्षणभंगुर आहे याचा

अर्थ तर नक्कीच तुला कळतो,

तरीही तू माझ्याशी बोलताना

उगाच काहीही का बरळतो?🙄

 

तू कळतंय ना! दिवसा मागे दिवस

या अशा अबोल्यातच निघून जातो,

मी पण पाहते तुझा हा वेडा रुसवा

न बोलता असाच किती दिवस राहतो?🙄

 

तुझा बालिशपणा पाहून समोरचा माणूस

तुला नात्याचे महत्त्व पटवून देतो,

मी समजून घेण्याची शिक्षा म्हणून

तू माझ्या मैत्रीची परीक्षा का घेतो?🙄

 

जीवनात सहजासहजी नाही तर खरंच

खूप कष्टाने आपण प्रामाणिक मित्र कमावतो,

प्रेमासाठी खूप मोठे कोडे आहे की,

बालिश हट्टापायी माणूस चांगली मैत्री का गमावतो?🙄

– प्रेमा