कधी कधी मनुष्य प्राणी खूप विचित्र वागतो,
स्वतःचे झाकून दुसऱ्याचे दुःख वाकून बघतो.

समोरच्याचे म्हणणे योग्य असे तरी कधी न मानतो,
दुसऱ्याला कधीही कमी लेखणे मनोमन जाणतो.

स्वतःचे अवगुण हे गुण म्हणून गोडवे गातो,
दुसरी पण माणसं आहेत हे मात्र विसरून जातो.

स्वतःत असलेली कमी मनातून कधी न पाहतो,
दुसऱ्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहतो.

स्वमग्नतेत प्रेमाचे चार शब्द धुडकावून लावतो,
या मनुष्याला देव कधीतरी योग्य-अयोग्य दावतो.

आपल्या जीवनात खरा यशस्वी तोच मनुष्य होतो,
जो खुल्या अंतःकरणाने वैश्विक प्रेमाची कास धरतो.

– प्रेमा