तुझे माझे हे नाते आहे जगाच्या निराळे,
आपल्या मैत्रीचे बंध कोणाला न कळाले.💝
गप्पा मारताना आपल्याला वेळ कळत नाही,
मन मोकळे करताना मागे काही उरत नाही.❤️
आपण संवाद करताना पडतो दूनियाचा विसर,
बोलताना आपण मागे ठेवत नाही कसलीच कसर.💖
विश्वास आणि प्रामाणिकपणा आहे आपल्या मैत्रीचा धागा,
आभासी दुनियेत गुंतण्या आधीच तू हो मित्रा जागा.♥️
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अशी आपली मैत्री,
दुरावा नको देऊ कधी तिला आहे तुझी खूप खात्री.💗
अल्लडपणा सोडून आता वेड्या तू मोठा हो थोडासा,
दुनियादारी अनुभवण्यासाठी तू सज्ज हो भल्या माणसा.❣️
मैत्रीतील प्रेमाचा हा गुंता कायम असाच वाढू दे,
आपली ही निखळ आणि प्रेमळ मैत्री जगाला कळू दे.💞
– प्रेमा