या अवखळ केसांना माझ्या स्वप्नात येऊदे ना सजनी.
या झुबकेदार केसांशी मनसोक्त खेळु दे ना सजनी..♥️
या सुंदर केसांप्रतीचे प्रेम थोडं जाणून घे ना सजनी.
या लांबसडक केसात गजरा माळूदे ना सजनी..💖
या नटखट केसांशी थोडं हितगुज करूदे ना सजनी.
या केसांच्या बटा तुझ्या चेहऱ्यावरून थोडं मागे सारूदे ना सजनी..💝
या सुंदर केसांवर थोडं निस्सीम प्रेम करूदे ना सजनी.
या हवेत तरंगणाऱ्या केसांना माझ्या चेहऱ्यावरून फिरुदे ना सजनी..♥️
या अप्रतिम सौंदर्याचा थोडा आनंद घेऊ दे ना सजनी.
या नागिण वळणाच्या वेणीत थोडं हरवू दे ना सजनी..💖
या केसांप्रतीच्या माझ्या वेडाला थोडं समजून घे ना सजनी.
या तुझ्या लांब केसांच गुपित मला कळूदे ना सजनी..💝
– प्रेमा
August 2, 2021 at 1:19 pm
सुंदर शब्दांकन,
थोडे चार केस माझ्या डोक्यावर ही येऊ दे ना साजणी😉
August 2, 2021 at 1:51 pm
का नाही सजनी.😀
धन्यवाद.🙏
August 2, 2021 at 2:11 pm
Itke jast kes dokyaver gheun kashi firtes ga sajani,
De mala thode apan he ozha vatun gheun sajani
August 2, 2021 at 4:06 pm
बरं ताई.😂😂
धन्यवाद!🙏❤️
January 10, 2022 at 6:29 am
सजनी ,केसांमधेच सौंदर्य असतं स्त्रीचं खरंतर. आम्हाला नीम्मे दीले तरी आम्ही शायनींग मारू ,
January 10, 2022 at 8:33 am
ताई.😀😀
धन्यवाद!🙏😊