मैत्री आपली या ग्रूपची दुनिया वेगळी,
दूर राहूनही वाटे राहतो खूप जवळी.🤗
विश्वासाने आपण सगळे सुखदुःख वाटतो इथे प्रत्येकांशी,
मैत्रीचे अनोखे बंध जुळले हे आपले एकमेकांशी.👭🌹
आपल्या या ऑनलाईन मैत्रीत फिकीर न दुनयेची,
प्रत्यक्ष भेट न होता ही वाटे आपली ही मैत्री आपुलकीची.👬💓
रुसवे फुगवे करण्यास मिळे इथे सवलत,
ही तर आहे आपल्या मैत्रीची खासियत.😘
गप्पा, गोष्टी, मज्जा आणि मस्ती आहे इथले अटेंशन,
ग्रुप मध्ये थोडा वेळ येऊन दूर होते सगळे टेंशन.🤷‍♀️
सगळेच सदस्य आहेत इथे खूप समजदार,
समस्या सोडवण्यास मिळतो सर्वांना आधार.🤝
इथे आपण सगळे आहोत एकमेकांसाठी समान,
त्यामुळे राखला जातो आपोआप सगळ्यांचा मान.👏
सुचिता, अनामिका, योगिनी, अल्पना, संजय, अमित, विशाल आणि प्रेमाचा हा प्रेमळ ग्रुप,
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आले याला कुटुंबाचे स्वरूप.🥰
आपले बंध मैत्रीचे कायम असेच राखुया हीच एक इच्छा,
प्रिय तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!💝♥️💖
– प्रेमा