दिसते भारी तशीच हसते भारी,
नेहमीच आनंदी अशी आमच्या सुचीची स्वारी.😀
तिचा आवडता शब्द हा गळपटला,
तिचा प्रेमळ स्वभाव आम्हाला पटला.👍
सगळ्यांना धरून ठेवणे तिची जमेची बाजू,
स्वतःचे कौतुक ऐकताना अजिबात नको लाजू.😂
न थकता सतत करते कितीही बडबड,
जेवणात माश्यांची तिला भारी आवड.😛
पॉडकास्ट वर प्रश्न विचारून करते भारी कमाल,
उत्तर देता देता बीबीसीवाल्यांची येते धमाल.😝
आपली मैत्री सोशल मीडियाची वाटत नाही,
रोज गप्पा टप्पा केल्या शिवाय करमत नाही.🤗
कामामध्ये आहेस तू नेहमीच हुशार,
बिनकामी होतात तुला बघून पसार.🙄
गरिबांना देतेस तू नेहमीच मदतीचा हात,
तुझ्यामुळे आनंद नांदतो त्यांच्या घरात.🥰
अनाथ, वृध्द, विधवांची बनतेस तू वाली,
तुझ्या रूपाने मिळते त्यांना मायेची सावली.😍
तुझ्या यशाची उंची नेहमीच वाढत जावो,
आयुष्यात पुढे जाताना तुला कशाची तमा न राहो.☺️
नेहमीच पूर्ण होवो तुझ्या मनातील सर्व इच्छा,
प्रिय सुचिता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🤩
– प्रेमा
July 31, 2021 at 1:38 pm
Thank you prema, खरंच ही मी आहे का. Love you dear
July 31, 2021 at 1:41 pm
Yes Dear, love u too.
Thanks.🙏
July 31, 2021 at 2:16 pm
Really very Very Beautiful words… 👍👍👍
August 1, 2021 at 3:34 pm
Thank you so much Dada.🙏
August 1, 2021 at 10:54 am
Very nice dear
August 1, 2021 at 3:34 pm
Thank you Dear.🙏☺️