तुझं माझं हे सततच भांडणं विनाकारण आहे,
अखंड मैत्रीत बुडाल्याचे हे एक उदाहरण आहे.😊
शंभर मित्र मैत्रिणी असूनही एकमेकांशी न बोलता रहावत नसणं कशाची तरी चाहूल आहे,
नक्कीच हे आपल्या मैत्रीचे पुढचे घट्ट असे एक पाऊल आहे.☺️
मैत्रीच्या गप्पा टप्पात वेळेचे भान न राहणे साहजिक आहे,
कारण आपल्या या मैत्रीची झालर थोडीशी भावनिक आहे.🥰
सतत गप्पा मारत राहणं हा आपल्या प्रेमाचा दुवा आहे,
वेळ असूनही एकमेकांशी मुद्दाम बोलणे टाळणं हा नक्कीच दुरावा आहे.🙄
तुझं अबोल राहणं दर्शवते काहीतरी संभावना आहे,
आपलं मैत्रीचं हे सुंदर नातं माझ्या कवितेची प्रेरणा आहे.🤗
या प्रेमाची निखळ मैत्री सतत तुझ्या सोबत आहे,
आपल्या निखळ मैत्रीतील ही एक अनोखी महोबत आहे.😍
– प्रेमा