माझी कविता माझ्यावर रुसली आहे,
कोपऱ्यात जाऊन बसली आहे.
काय करावे काही आता सुचत नाही,
कितीही विनवले तरी ती रुसवा काही सोडत नाही.
सगळया प्रकारे तिला समजावून झाले आहे,
या वेळेचे प्रकरण तिने जरा अवघड केले आहे.
कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही,
कितीही मनवल तरी अजिबात मानत नाही.
अचानक जवळ आल्याचे भासवते,
आणि दुसऱ्या क्षणाला मला चकवा देते.
हा रुसवा कसा काढावा काही कळत नाही,
तिच्या शिवाय मला पण करमत नाही.
आता मी पण तिच्यावर रुसणार आहे,
कोपऱ्यात जाऊन बसणार आहे.
तिचा रुसवा अजुन काढणार नाही,
प्रेमा शिवाय तिला पण राहवणार नाही.
तिचा हा फसवा रुसवा आता जाणार आहे.
प्रेमा सोबत ती पहिल्या सारखीच बागडणार आहे.
-प्रेमा
August 21, 2021 at 8:33 am
छान
August 21, 2021 at 2:31 pm
धन्यवाद ताई.🙏😊
August 21, 2021 at 8:50 am
❤️ रुसवा जाईल आता 😀
August 21, 2021 at 2:32 pm
😀😀
धन्यवाद!🙏
August 21, 2021 at 8:55 am
प्रेमा तू इतकी गोड आहेस की तुझ्यावर कोणीही रुसू शकत नाही, अगदी तुझ्या जीवा भावाची कविता सुद्धा नाही. बघ मागे वळून ती कोपऱ्यात बसून तुला बोलावते आहे.
August 21, 2021 at 2:33 pm
ताई मनापासून धन्यवाद!🙏😊
August 21, 2021 at 9:16 am
वाहहह वाहहह…. ती रूसली नाही तर तुझ्यावर चांगलीच प्रसन्न आहे… त्यामुळेच तुला अशा सुंदर कल्पना अन् शब्द सुचतात…
खूप छान… तुझी काव्यप्रतिभा अशीच बहरत जावो, हीच शुभेच्छा 👍👍👍
August 21, 2021 at 2:34 pm
मनापासुन धन्यवाद दादा.🙏😊