हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला,
आणि मला बऱ्याच काही गोष्टी शिकवून गेला.

याच्या येण्याने मला शारीरिक त्रास कितीही झाला;
तरी मन खंबीर ठेवणे महत्वाचे हे शिकवून गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

सुखात सगळेच असतात हे खरे असले;
तरी दुःखात जवळ असणारे दाखवून गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

रोज बोलत असणारे अशा परिस्थितीत दुर गेले;
तरी आपुलकीने चौकशी करणारे नवीन मिञ जोडून गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

घरच्यांना मानसिक शारीरिक त्रास देऊन गेला;
पण जीवनात दूर असणारी नाती कायमसाठी जोडून गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

घरातील सगळ्यांना आजारी करून गेला;
तसेच घरच्या सगळ्यांना सांभाळण्याचे धैर्य ही देऊन गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

आमच्या खूप जवळची व्यक्ती नेऊन कधी न भरून निघणारा लॉस करून गेला;
पण या कठीण काळात जवळच्यांना धीर देण्याचे टेक्निक शिकवून ही गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

मेसेंजर, फेसबुकला सर्व जग नावे ठेवत असले;
तरी या दुरव्याच्या काळात सामंजस, ज्ञानी लोकांशी ओळख वाढवून गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

जीवनात कितीही मोठे दुःख समोर आले;
तरी रडत न बसता धेर्याने सामोरे जायचे हे दाखवून गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

जबाबदारी पेलण्यात कधीही माघार घेत नसले;
तरी लहानपणीच मोठी झाल्याची जाणीव देऊन गेला.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला..

या लॉकडाऊनच्या काळात सर्वांनाच खूप काही शिकता आलं,
जन्मभराचं दु:ख सोसून परत नीट जगता आलं.
हा विचित्र कोविड १५ दिवस माझ्या भेटीला आला…

हा विचित्र कोविड १५ दिवस घरच्या सर्वांच्या भेटीला आला;
पण जीवनाकडे हसतमुखाने बघण्याचं नविन बळ प्रेमाला देऊन गेला..
-प्रेमा