माझ्या मैत्रीत तुझ्या
दिसण्याला महत्त्व नाही
तर तुझ्या असण्याला
महत्त्व आहे.☺️
माझ्या मैत्रीत तुझ्या
बढाया मारण्याला
महत्त्व नाही तर तुझ्या
व्यक्त होण्याला महत्त्व आहे.☺️
माझ्या मैत्रीत तुझ्या
वयाला महत्व नाही
तर तुझ्या समजादरपणाला
महत्त्व आहे.☺️
माझ्या मैत्रीत तुझं सुख
ऐकण्याला महत्व नाही
तर तुझे दुःख जाणून
घेण्याला महत्त्व आहे.☺️
माझ्या मैत्रीत तुझ्या
पैशाला महत्त्व नाही
तर तुझ्या माणूस
असण्याला महत्त्व आहे.☺️
माझ्या मैत्रीत तुझ्या
चुकांना महत्त्व नाही
तर तुझ्या सुधारण्याला
महत्त्व आहे.☺️
– प्रेमा
January 12, 2022 at 1:03 pm
Too good
January 12, 2022 at 1:09 pm
Thank you so much.🙏😊