मुलगी लहान असताना करतात सगळेच तिचे लाड;
ती मोठी झाली की म्हणतात तिला होऊ नको जाड.
घरच्यांनी वसा घेतला पाहिजे, हा शरीर सौंदर्याचा बाजार थांबवला पाहिजे;
कधीतरी समाजाला नमवलं पाहिजे, आता हे थांबवलं पाहिजे.
तिला लहानपणापासून जपतात एवढं जीवापाड;
तर मग लग्नाच्या बाजाराचं डोक्यात येतं कुठून फ्याड.
आता पालकांचे प्रबोधन केले पाहिजे, मुलींच्या बौध्दीकतेला महत्त्व दिले पाहिजे;
सौंदर्याची व्याख्या बदलवली पाहिजे, मुलांना ही अक्कल आली पाहिजे.
मग मुलगा मुलगी एक समान हे फक्त कागदावर राहणार नाही;
समाजात कोणत्याच बाबतीत मुलगा मुलगी हा भेद होणार नाही.
– प्रेमा
December 15, 2021 at 12:46 pm
वाहहहह वाहहह… खूपच छान… होईल का खरच असं कधी???
December 16, 2021 at 7:12 am
होईल होईल.
धन्यवाद!🙏😊
December 16, 2021 at 3:41 pm
हे कधी होईल माहित नाही. सगळ्यांना गोरी, उंची सुसंस्कृत मुळी हव्या असतात?!
December 17, 2021 at 3:58 am
हो ना.
धन्यवाद!🙏😊