तुला दुखावणारे असतील बहु

तू दुःखात पण सुख शोधत रहा.

जीवनात कितीही संकटे आली

तरी स्वतःला सिद्ध करत रहा.

लोकं काय म्हणतील याकडे

कानाडोळा करत रहा.

कोणी कोणाचे नसतं म्हणून

तू आपल्याच धुंदीत जगत रहा.

कोणी कसेही असो तू आनंदाने

कर्तव्य पार पाडत रहा.

विसरतील तुला सगळे तरी

स्वतःला तू लक्षात ठेवत रहा.

जीवन हे पाण्यावरचा बुडबुडा

म्हणून आनंदात सहभाग घेत रहा.

येणारा क्षण कसाही असो

सतत स्वतःला सावरत रहा.

कधी भरून आले डोळे तर

स्वतःचे सांत्वन करत रहा.

चुकून वाईट विचार आलाच मनात

तर जीवनाचे ध्येय आठवत रहा.

आयुष्यात चढ उतार असले

तरी जीवन गाणे तू गात रहा.

आवश्यकता कधी भासलीच

तर प्रेमाचा सल्ला घेत रहा.

फक्त तू सुखी, समाधानी, हसमुख आणि

खळखळत्या झऱ्या सारखं आनंदी रहा.

– प्रेमा