असाच समुद्रा सारखा गूढ रहा

जसा आहेस तसाच कायम रहा

फक्त तुझ्या गुणास मी भाळले

त्यामुळे माझे मला न सांभाळले

अलगद तुझ्या प्रेमात मी पडले

सगळे काही तिथेच तर अडले

तुझी ही आश्वासक आणि प्रेमळ मिठी

थोडा वेळ नाही तर हवी असते ती कायमसाठी

तू असाच रहा जसा आहेस तसाच रहा

– प्रेमा