रोजच्या त्याच चाकोरी पेक्षा एखादा निवांत दिवस असावा,

यामध्ये कोणत्याच कामाचा आणि नियमांचा हट्ट नसावा.

या दिवशी फक्त खाणे – पिणे आणि लोळणे एवढाच एक टास्क असावा,

मनात येणाऱ्या असंख्य विचारांना तर इथे अजिबात थारा नसावा.

बघेल तिकडे मनमोहक आणि आनंदाचा मोहोल दिसावा,

असा हा हर्षाचा दिवस किमान महिन्यातून एकदा तरी व्यक्तिच्या जीवनात येऊन बसावा.

– प्रेमा