लोकांनी नियम न पाळल्यामुळे
परत रस्ते पडले ओसाड,
मुलांच्या सामाजिकरणात परत
एकदा लॉकडाऊन आले आड.
कोरोनाचे सर्व नियम दिसत
आहेत फक्त खिळ्यावर,
नागरिक बिनधास्त फिरती
सर्व नियम मारून फाट्यावर.
समाजाच्या दुर्लक्षाने कोरोनाने
परत एकदा घातला आहे गोंधळ,
पेशंटचे जीव वाचवण्यासाठी
होत आहे सर्वांची धावपळ.
बेड आणि रेमडेसिविरचा
सुरू आहे एकच गदारोळ,
यामुळे सर्वसामान्य जनतेचे
मरण झाले आता अटळ.
सरकारी यंत्रणेचा भोंगळा कारभार
परत एकदा आला समोर,
मृत्यू पावणाऱ्या पेशंट विषयी
सर्व करतात सावरासावर.
एक पेशंट मरणे समाजासाठी
आकडेवारी असेल पर,
त्याच्या घरच्या सर्वांसाठी
आहे दुःखाचा मोठा डोंगर.
प्रेमाचे सांगणे सर्वांना
गरज नसताना बाहेर पडणे टाळा,
आपण सगळे मिळून जिद्दीने
कोरोना महामारीला घालुया आळा.
– प्रेमा
April 13, 2021 at 12:20 pm
Khup chan, must
April 15, 2021 at 8:11 am
Thank you so much.🙏
April 27, 2021 at 11:41 am
सुरेख ओळी…👌👌
April 27, 2021 at 12:30 pm
खूप खूप धन्यवाद.🙏😊
April 27, 2021 at 11:42 am
सुरेख ओळी 👌👌
April 27, 2021 at 12:32 pm
धन्यवाद.🙏
December 14, 2021 at 3:45 am
वास्तववादी वर्णन, मनाला भिडले!
December 15, 2021 at 5:19 am
धन्यवाद!🙏😊
December 14, 2021 at 5:26 am
Wwwaahhh wwwaahhh…. Massstach…khooopach chhaann 👍👍👍
December 15, 2021 at 5:19 am
धन्यवाद दादा!🙏😊
December 14, 2021 at 6:00 am
खरय. अशीच परिस्थिती होती व आहे. सर्वांनी नियम पाळले तरच नी तरच करो ना हद्दपार होईल. तेव्हा त्रीसुत्री पाळा व आजार टाळा. प्रेमाचे सांगणे ऐका
December 15, 2021 at 5:20 am
धन्यवाद ताई.🙏😊
December 14, 2021 at 6:24 am
हे खरंच त्या वेळेचं भयाण वास्तव्य होतं आणि तू ते खूप सुंदर रित्या मांडला आहेस. पण अजून ही लोकं तशीच बेदरकार पणें वागता आहेत and akdi शुलक कारण असेल तरी बाहेर फिरता आहेत आणि तेही बिना मास्क!!!
December 15, 2021 at 5:20 am
हो ना ताई.
धन्यवाद!🙏😊