त्याचे मला अगदी फुलाप्रमाणे जपणे,
माझ्या आनंदासाठी सतत धडपड करणे;
हे पहिलं प्रेम तर नसेल ना?
स्वतःला विसरून या प्रेमात दंग होणे,
लहान मुला प्रमाणे माझे लाड पुरवणे;
हे पहिलं प्रेम तर नसेल ना?
एकटी असताना सतत त्याचा विचार येणे,
माझे त्याच्यात नकळत हरवून जाणे;
हे पहिलं प्रेम तर नसेल ना?
त्याच्यासाठी माझं सर्वस्व अर्पण करणे,
कायम त्याची आणि त्याचीच बनून राहणे;
हे पहिलं प्रेम तर नसेल ना?
– प्रेमा
November 26, 2021 at 6:26 am
Asa prem pahila ani shevtcha asta!!!
November 26, 2021 at 7:51 am
Thank you.😊
November 26, 2021 at 8:14 am
हा, यही प्यार है… 👍👍👍
November 26, 2021 at 9:36 am
शुक्रिया जी.🙏😊