राजश्री मॅडम आणि मदन सरांचा सूर्यनमस्कार ग्रूप,

या दिग्गजांच्या प्रेरणेने येतो आम्हा सर्वांना हुरूप.☺️

 

ग्रूप सदस्य आहेत समंजस आणि एका पेक्षा एक सरस,

पण कोणीही करत नाही इतरांना कमी लेखण्याचा अट्टाहास.😊

 

थोडे स्ट्रिक्टच आहेत ग्रूपचे बाई ॲडमिन,

त्यामुळे इथे होत नाही चर्चा अर्थहीन.😀

 

हसत खेळत सूर्यनमस्कार चर्चा रंगतात,

ग्रूप सदस्य पुढचे लक्ष मनोमन ठरवतात.🤗

 

इथे असते स्पर्धा स्वतःचीच स्वतःशी,

म्हणून तुलना होत नाही कोणाचीच कोणाशी.😇

 

ग्रूप करतो नेहमी सूर्यनमस्कार संख्या विक्रमी,

असा हा ग्रुप सर्व सदस्यांना आवडतो मनोमनी.😍

 

प्रेमाला वाटते थोडा उशीरच केला ग्रूप जॉईन करण्यास,

अजुन आपल्याकडे वेळ आहे मागची कसर भरून काढण्यास.😅

-प्रेमा