सगळे नियम पाळून पण व्हायचे तेच झाले,

चोर कोरोनाने हळूच आमचे घर गाठले.

माहिती नाही काय होते त्या वेड्याच्या मनात,

आम्ही सगळ्यांनी जिद्दीने केली त्यावर मात.

डॉक्टर स्वप्ना माने आयुर्वेदात फारच हुशार,

त्यांच्या प्रयत्नाने कोरोना लवकरच झाला घरातून हद्दपार.

दिवस रात्र न पाहता त्यांनी माणुसकीने उपचार केले,

त्यांच्या रुपात आम्हाला देवमाणसाचे दर्शन घडले.

त्यांचे प्रसन्न रूप आणि सकारात्मकता आहे जबरदस्त,

त्यांना भेटून पेशंट होतो एकदम फ्रेश आणि मस्त.

वेडा कोरोना ठाण मांडून बसला होता आमच्या घरात,

डॉक्टर स्वप्नांच्या मदतीने काढली त्याची चांगलीच वरात.

या कोरोनाने बाई आमची झोप उडविली,

आम्ही पण त्याला चांगलीच अद्दल घडवली.

आता फक्त मॉम ठिक होऊन घरी येण्याची प्रतीक्षा आहे,

त्या लवकरच बऱ्या होतील हिच एक आशा आहे.

                                                         – प्रेमा