गोड तुझे हास्य सखे

मन माझे चाळवी,

तुझ्या गोड आठवणी

मला रात्र रात्र जागवी.

देखणे रूप तुझे पाहून

मनोमन नकळत भाळतो,

त्रास नको तुला म्हणून

स्वतःला मी सांभाळतो.

सांग तुझ्या शिवाय कसा,

पचवू मी एकटा हा दुरावा.

मनापासून वाटे सखे एकदा तरी,

माझ्या भेटीचा हट्ट तू पूर्ण करावा.

– प्रेमा