आम्हाला बाळा शिवाय बोलत नव्हत्या अशा होत्या आमच्या मॉम.
घरातील स्वच्छ्ता आणि नीटनेटकेपणा असायचे तुमचे चोख काम मॉम..
घरातील सगळे क्षणा क्षणाला तुमची आठवण करतात मॉम.
तुमची घरी येण्याची तीव्र इच्छा असूनही आम्ही तुम्हाला घरी नाही आणू शकलो मॉम..
तुम्ही शरीराने आमच्यात नाही हे पचवणे खूप कठीण जात आहे मॉम.
तुम्हाला सोडून कधीच एकटं राहण्याची सवय नसणाऱ्या घराला क्षणोक्षणी तुमची कमी जाणवते मॉम..
तुमचा आवाज मिस करणारा तुमचा बाबू घरात न थांबता सतत गॅलरीत असतो मॉम.
तुमची आठवण येणारा दादा स्वतःला कामात गुंतून घेत आहे मॉम..
मॉममय असणारी जयू तुम्हाला सगळीकडे शोधत असते मॉम.
तुम्ही प्रेमाने देणारी प्रेमू ही हाक परत कशी ऐकू मॉम..
अतिशय प्रेमाने सजवलेलं तुमचं घर तुमची अजूनही वाट पाहत आहे मॉम.
आपले कुटुंब आनंदी आणि सुखी ठेवण्यासाठी तुम्ही कायम तत्पर होता मॉम..
तुमच्या मजेशीर गोष्टी आठवल्या की सगळेच हसतात जाम मॉम.
आठवणी आणि विचाराने कायम आमच्या सोबत असणार आमच्या प्रेमळ मॉम…
– प्रेमा
July 31, 2021 at 1:33 pm
It’s a beautiful ode to your mom, I guess you mother in law!! In every word your love for her and also her love for you is reflected.
July 31, 2021 at 1:40 pm
Yes Tai.
Thank you so much 🙏🥰