ग्रुप वर येऊन नुसता दंगा मस्ती करी,

सुचीला आमच्या माशांची आवड भारी.😋

गोंधळ आम्हा दोघींचा म्हणजे ग्रुपची शान,

हे पाहून मास्तर होतात हैराण परेशान.🙄

सूची सूची करत रोज इथे येती योगिनी ताई,

ग्रुप शिवाय यांना अजिबात करमत नाही बाई.😂

ग्रुपच्या हुशार सदस्य आहेत ताई अल्पना,

आम्ही किती वेडे याची त्यांना काहीच न कल्पना.😜

कॉमेडी आहेत ग्रुपचे आमचे दादा कुल,

इथे येऊन त्यांना पडे कामाची नेहमीच भुल.🤣

गुणी मुलगी आहे ग्रुप मध्ये आपली अनामिका,

छान खुदकन हसणे थोडं तिच्याकडून शिका.🤗

ग्रुपचे प्रचंड गोंधळी सदस्य म्हणजे अमित,

“मी काही नाई केलं ओ” हे नेहमीच गातात गीत.🤭

विशाल म्हणजे ग्रुपचे सतत फिरते प्रवासी,

अधून मधून डोकावून करती ग्रूपची जासूसी.🧐

असा हा प्रेमाचा ग्रुप तयार झाला बीबीसी पॉडकास्टच्या निमित्ताने,

इथे गप्पा टप्पा करतात सगळे विश्वासाने आणि आनंदाने.🥰😀

– प्रेमा