मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..😍🥰
मनापासून आपुलकी, जिव्हाळा दाखवणाऱ्याच्या मी कायम मनात राहणार,😊
स्वार्थी आणि निर्लज्ज लोकांच्या नेहमी डोक्यात राहणार.😜
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
बोटावर मोजण्या इतक्याच प्रामाणिक लोकांशी मैत्री असणार,😊
फक्त दिखाव्यासाठी उगीच फुकट्या मित्रांची संख्या नाही वाढवणार.🙄
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
एकदा मैत्रीचे नैसर्गिक नाते तयार झाले तर ते निस्वार्थीपणे जपणार,🥰
गरजेपुरते कोणतेही नाते बनवून गैरफायदा घेणे मला नाही जमणार.😏
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
गरज पडली तर तोंडावर ऐकवून चूक दाखवून देणार,😛
तोंडावर गोड बोलून मागे निंदा करणे मला नाही जमणार.🤨
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
गरजू आणि गरीब लोकांना नेहमीच मदत करणार,😊
माजुरड्या आणि घमंडी लोकांना चार हात लांबच ठेवणार.🤭
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
स्वतःला आनंद मिळेल त्या सर्व सकारात्मक गोष्टी करणार,😍
समाज काय म्हणेल याकडे शून्य लक्ष देणार.😂
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
निसर्गातील विविधतेचा मनमुराद आनंद घेणार,🤩
निसर्गाची हानी होईल असे काही नाही करणार.😔
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
प्रेमातील ते छोट, निरागस बाळ कायम जिवंत राहणार,🤗
कोणी कितीही बोंबलं तरी अल्लडपणा, खळखळून हसणं नाही जाणार.😝
मी अशीच आहे आणि अशीच राहणार
समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️
– प्रेमा
May 7, 2021 at 2:39 pm
तू असा कसा … असा कसा … व व व वेगळा वेगळा … खूप छान लीहील आहे , लीहत रहा नेहमी
May 23, 2021 at 6:47 am
धन्यवाद!🙏
May 21, 2021 at 9:53 am
wwwahhhhh ….. ashich raha kayaam….. _/\_
May 23, 2021 at 6:47 am
धन्यवाद!👍🙏
June 27, 2021 at 5:55 am
तू जशी आहेस मला तू तशीच आवडणार,
तू तसू भर ही बदलाव असा मला कधीच नाही वाटणार.
June 27, 2021 at 12:55 pm
वा! वा!!
धन्यवाद!🙏