माझी प्रिय कोथिंबीर मला खूप आवडते,

कितीही घाई असो मी मात्र तिचीच निवड करते.😀

हिरवीगार आणि लुसलुशीत ती माझ्या नजरेतून सुटत नाही,

तिला हातात घेतल्या शिवाय माझा बाजार पूर्ण होत नाही.☺️

असा एकही पदार्थ नाही ज्यात मी तिला घालत नाही,

तिच्या चवी शिवाय मला अजिबात रहावत नाही.😋

तिचा तो अद्भुत सुगंध मनाला ताजेतवाने करतो,

तिच्यामुळे पोह्यांच्या गंधात आणि रंगात भर पडतो.🥰

कोणी काहीही म्हणू दे मी तिला पाणीपुरीत पण वापरते,

कधीही न कंटाळता तिची पण मला सतत सोबत असते.😍

आलं लसूण पेस्ट करताना तर त्यात कोथिंबीरच जास्त दिसते,

“या पोरीच्या कोथींबीर प्रेमाचं काय करावं” असं आई बडबडते.😂

आता कोणीही कितीही चिडवू दे मला, म्हणून कोथिंबीर वेडे,

कोणताही तिखट पदार्थ असो प्रेमा तिला कधी विसरत नाही गडे.😘

– प्रेमा