कडक उन्हा नंतर पावसाच्या
येणाऱ्या रिमझिम सरी,
पक्षी किलबिल करत
आपला आनंद व्यक्त करी,
झाडे झुडपे वाऱ्याच्या
झुळूकेवर खुशीने डौल धरी,
पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा
दिसणारी ही स्वच्छ झाडी,
मनावर आलेलं सर्व मळभ
स्वच्छ पुसून काढी,
निसर्ग सजला जशी घालून
भरजरीची हिरवी साडी,
मुले पाऊसात मनसोक्त हूंदडून
नंतर पालकांचे बोलणे खाई,
रस्त्यावरील ती हिरवी गर्द
झाडी डोळ्यास सुख देई,
असं हे निसर्ग सौंदर्य पाहून
मन आसमंतात झेप घेई.
– प्रेमा
June 27, 2021 at 8:46 am
❤️❤️❤️❤️❤️❤️
June 27, 2021 at 12:56 pm
🙏❤️
December 27, 2021 at 4:48 am
Wwwaahhh kyaaa baaat hai….. श्रावण आल्यासारखं वाटलं 😃👍👍👍
December 27, 2021 at 6:04 am
धन्यवाद दादा.🙏😊