अजूनही आठवतंय
दोन वेड्यांना भटकंतीच वेड असणं,
त्या वेडातून दोघांचं मनसोक्त फिरणं.
अजूनही आठवतंय
सतत सहवासाने एकमेकांना जाणून घेणं,
त्यातून हळूहळू आपली मैत्री फुलत जाणं.
अजूनही आठवतंय
रात्र रात्र उगाच गप्पात जागत राहणं,
सगळं काही विसरून ते लाडीवाळ बोलणं.
अजूनही आठवतंय
छोट्या छोट्या गोष्टींवरून अबोला धरणं,
मैत्रीचे किस्से सांगून हळूच रुसवा काढणं.
अजूनही आठवतंय.
सोबत फिरायला जाण्याची आतुरतेने वाट पाहणं,
तो भेटण्याचा दिवस उजाडला की आनंदून जाणं.
अजूनही आठवतंय.
गाडीवर बसताना प्रेमाचा नकळत स्पर्श होणं,
आणि त्या नाजुक स्पर्शाने मनोमन मोहरुन जाणं.
अजूनही आठवतंय
गाडीच्या अरशातून एकमेकांना चोरून पाहणं,
आपल्या मैत्रीच हळूवार प्रेमात रूपांतर होणं.
अजूनही आठवतंय
जीवनसाथी म्हणून तुझं आयुष्यात येणं,
आणि माझं आयुष्य आनंदाने फुलून जाणं.
– प्रेमा
August 6, 2021 at 2:27 pm
मस्तच. खूप गोड असतात नं या आठवणी. सुखाच्या हींदोळ्यावर झुलणाऱ्या. मस्तच गं
August 6, 2021 at 2:30 pm
हो ताई.🤗🙏
August 6, 2021 at 2:28 pm
This is how love happens. हुळवर पणें एकदम “भसकन” नाही होत.
August 6, 2021 at 2:30 pm
हो ना ताई.🥰🤗
August 6, 2021 at 2:28 pm
मस्तच. छान सुंदर असतात नं या आठवणी. सुखाच्या हींदोळ्यावर झुलणाऱ्या. अप्रतीम
August 6, 2021 at 2:30 pm
धन्यवाद!🙏☺️
August 6, 2021 at 2:30 pm
Khooopach chhaann कविता… सुंदर शब्द… सुंदर गुंफणही👍👍👍
August 6, 2021 at 3:12 pm
मनापासुन धन्यवाद दादा.🙏😊
August 6, 2021 at 2:42 pm
खूपच छान असतात त्या आठवणी 👌👌
मस्त कविता 👍👍
August 6, 2021 at 3:11 pm
धन्यवाद आप्पा.🙏😊
August 6, 2021 at 3:06 pm
अप्रतिम…. ❤️❤️❤️
खुप छान
August 6, 2021 at 3:11 pm
धन्यवाद सर.🙏😊
August 6, 2021 at 5:07 pm
मन बहरून आले कवितेचा अर्थ लयभारी 😍
August 7, 2021 at 10:14 am
धन्यवाद सखी.🙏☺️