समोरची व्यक्तीच कळली नाही
तर तिची मैत्री पण कळणार नाही,
यापुढे कोणी कोणाची अनोळखी
मैत्री सहज स्वीकारणार नाही.

निखळ मैत्रीचा अर्थ
ज्याला कधीच कळत नाही,
तिथे मैत्री टिकविण्याचा
प्रश्न अजिबात उरत नाही.
यापुढे कोणी कोणाची अनोळखी..

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात
अशी मैत्री कामाची नाही,
समोरच्या व्यक्तीचा अविश्वास पाहून
तिचे हाल होणे बरोबर नाही.
यापुढे कोणी कोणाची अनोळखी..

कायम कन्फ्युज असणाऱ्या व्यक्तीने
मैत्रीच्या फंदात कधी पडू नये,
टाईम पास म्हणून कोणाशी
उसनवारी मैत्री करू नये.
यापुढे कोणी कोणाची अनोळखी..

वागणं एक आणि बोलणं एक
याने ती कधीच विश्वासू होत नाही,
मैत्री ही दोघांच्या निखळ संवादा
शिवाय एकत्र बांधून राहत नाही.
यापुढे कोणी कोणाची अनोळखी..

मोठ मोठ्या बढाया मारून
ती मैत्री कधीच घट्ट होत नाही ,
तिची परस्पर विश्वासाची भावना
कधीच फिट्ट होत नाही.
यापुढे कोणी कोणाची अनोळखी..

एकाने तोडणे – दुसऱ्याने जोडणे
या तत्त्वाचा उपयोग होत नाही,
कितीही केले प्रयत्न तरी अशी मैत्री
जास्त काळ टिकू शकत नाही.
यापुढे कोणी कोणाची अनोळखी..
– प्रेमा