(सत्य घटनेवर आधारित)
प्रिय सखी तुला आत्ता लगेच थकून चालणार नाही,
अजुन थोडे कष्ट केल्याशिवाय यश मिळणार नाही.
मान्य, तुला सहन करावं लागतं सध्या सगळं,
हे जग खरंच या पेक्षा नाही ग राणी वेगळं.
जोडीदारासाठी तू खपत आहेस रात्रंदिन,
आम्हाला तुझ्यातली दिसून येते खरी जोडीदारीण.
त्यालाही कळत असेल ग तुझ्या मनीच दुःख,
तो ही तुझ्या सांत्वनसाठी उघडेल लवकरच मुख.
तुमच्या इवल्याशा पिल्याचे भविष्य उज्वल करणे आहे बाकी,
हे सगळे तुला अजून पार पाडायचे आहे माझी सखी.
आमचा भावनिक आधार सतत मिळत राहील,
तुमचे आयुष्य परत लवकरच सुखाने फुलत जाईल.
अर्ध्या पेक्षा जास्त दुःखाचा डोंगर पार केलास तू जिद्दीने,
थोडंसं शेपूट उरलं आहे ते ही पार करशील तू हिंमतीने.
तुझ्या या अपार कष्टाला लवकरच न्याय मिळेल,
तुमच्या कुटुंबात परत एकदा आनंद दरवळेल.
– प्रेमा
November 10, 2021 at 9:36 am
जोडीदारीन च्या मनातले भाव, relate झाले खूप मनाला
November 10, 2021 at 9:39 am
धन्यवाद!🙏
November 10, 2021 at 2:04 pm
तु ही कविता कोणासाठी लिहिली आहेस हे माहीत नाही पण तू माझ्याशी बोलत असल्यासारखं मला वाटलं. तू प्रत्येक जोडीदाराच्या मनातलं बोललीस आणि खरंतर प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराने आपल्याला असं म्हणावं हे वाटत असतं. खूप छान लिहितेस तु ही कविता कोणासाठी लिहिली आहेस हे माहीत नाही पण तू माझ्याशी बोलत असल्यासारखं मला वाटलं. तू प्रत्येक जोडीदाराच्या मनातलं बोललीस आणि खरंतर प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराने आपल्याला असं म्हणावं हे वाटत असतं. खूप छान लिहितेस बाळा अशीच लिहित रहा!
November 10, 2021 at 2:10 pm
खूप महत्वपूर्ण अभिप्राय आहे ताई.🙏😊
November 10, 2021 at 5:58 pm
❤️❤️❤️ कुणासाठी आहे पण कविता ❤️❤️
November 10, 2021 at 5:59 pm
मैत्रिणीसाठी.😊
November 10, 2021 at 7:09 pm
Mast….
November 11, 2021 at 3:02 am
Thanks.🙏😊