नवनवीन रस्ते शोधणारी आमची लाडकी गाडी,
गाडी सोबत फिरणारी आमची वेडी जोडी.🚘

रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवळ आणि निसर्ग अतिशय सुंदर,
छान डांबरी रस्ता पाहून गाडी चालवताना ताबा ठेवावा लागतो मनावर.😊

घाटातील पवनचक्कीची पांढरी मोठी रांग पाहून मन प्रसन्न होते,
त्यांचे मोठं मोठे पाते आपल्याला जवळ बोलावते.☢️

असा हा सुंदर रस्ता संपूच नये असे जेंव्हा वाटते,
तेंव्हाच नेमके गाडी पुढचा अवघड कच्चा रस्ता गाठते.🙆🏻‍♀️

रस्त्याला एकही गाडी नाही हे पाहून आम्ही थोडे चरकलो,
वाटले, आता आपण नक्कीच कुठे तरी भरकटलो.😀

फोटोची आवड असणाऱ्या मला मिळाला एक पॉइंट छान,
मग हा रस्ता निवडल्याचा वाटला थोडा अभिमान.🥰

एकदम चढ आणि उताराची अशी ही कच्ची वाट,
गाडीने पार केला हा अवघड आणि विचित्र वळणाचा घाट.☺️
– प्रेमा