प्रिय सर,
बघा ना सर तुमचा आज परत एक वाढदिवस,
लक्षात आहेत तुमच्या सोबतचे ते छान छान दिवस.
ऑफीस तुमच्या प्रेमळ आवाजाने दणाणून जाई,
आम्हा सर्वांना तुमच्या Good Morning ची खूप आठवण होई.
आठवतात तुमच्या सोबतचे सर्व आनंदी क्षण,
आमच्यात नाहीत हे अजूनही मान्य करत नाही मन.
गेलात तिथे पण सर्वांना आपलंसं केलं असणार,
आम्ही सगळे फक्त तुमची आठवण करत बसणार.
तुमचा वाढदिवस म्हणजे असायचा पार्टीचा दिवस,
ऋग्वेद आणि वहिनींचा अतिशय आनंदाचा दिवस.
काय लिहावे काही सुचत नाही, खात्री आहे गेला तिथे सुखी रहाल,
नेहमीप्रमाणे आम्हा सर्वांना इथे आनंदात पहाल.
– प्रेमा
Leave a Reply