(सर्व स्वच्छता कर्मचारी व काळजीवाहक बंधू आणि भगिनींना समर्पित)

स्वच्छतेच्या कामासाठी तू नाहीस कोणाला लाजत

ना नाहीस कोणाला भित,

कामाशी जुळले आहे तुझे खूप जवळून सूत;

कारण तू आहेस एक सच्चा स्वच्छता दूत.

 

भल्या पहाटे उठून स्वच्छ करतोस सगळे रस्ते आणि शौचालय,

सर्वांना दिसतं स्वच्छतेच्या कामाची गाठ तू मनाशी बांधलीय;

तुझ्या या कष्टाला स्वच्छता दूत नावाची झालर चढलीय

 

तुझा दिवस सुरू होतो शौचालयात किंवा रस्त्यावरी,

रोज नागरिक भेटती तुला खट्याळ आणि ना ना परी;

कधी कडवट तर कधी गोड बोलून त्यांना आणशी तू मार्गावरी.

 

नागरिक आणि राजकारणी यांच्यामध्ये कसरत होते तुझी फार,

या धावपळीत तुझे हाल होताना दिसतात बेकार,

आहे त्या परिस्थितीत काम करतोस हे तुझ्या कष्टाचे सार.

 

महिला स्वच्छता दुताची तर दुहेरी कसरत,

कामावर आले तरी घरकाम असते पाय पसरत;

सर्व जबाबदारी पार पाडताना ती संसाराचा गाडा नाही विसरत.

 

काम करताना थोडी आरोग्याची काळजी घे,

तुझ्यावर सर्व कुटुंब अवलंबून आहे हे ध्यानी असु दे;

तुझ्यातील आरोग्यदायी स्वच्छता दूत आम्हाला दिसु दे.

 

तुला थकून भागून चालणार नाही हे असुदे ध्यानात,

तुझ्या जागृतीमुळे भर पडते लोकांच्या ज्ञानात;

स्वच्छता दूत म्हणून कायम राहशील तू सगळ्यांच्या मनात.

– प्रेमा