तुझे मेसेज आणि पोस्ट पाहून ओठांवर येतं हास्य
ग्रुपला सतत हसवत ठेवणारा तू एक छान सदस्य.🥰
गोड बोलून सगळ्यांना ग्रुप वर येण्यास भाग पाडतोस
म्हणूनच की काय नेहमीच ग्रूपचा कान्हा ठरतोस.😂
तू ग्रुप वर आलास की करतोस खूप बडबड
त्यामुळे बाकी सदस्यांच्या कामाची होते गडबड.🤩
तुझ्या मजाक करण्याला नाही कशाचाच जबाब
तुझा स्टेटस कधीही पहा लिहिलेला असतो रुबाब.🤣
जॉब सोबत शेती कासण्याची तुझी भारी आवड
ती जपण्यासाठी सरकारी कामातून काढतोस सवड.🤗
तुझी मजाक करण्याची सवय अशीच कायम राहू दे
तुझ्या सारखा हसवणारा मित्र प्रत्येकाला मिळू दे.😍
पूर्ण होऊ दे तुझ्या मनातील सर्व आकांक्षा आणि इच्छा
प्रिय शिरीष तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎊🎉
– प्रेमा
Leave a Reply