तुझं ते चालणं
चालताना मागे वळून पाहणं
मनाला भुरळ घालतं ग.☺️
तुझं ते निरागस हसणं
हसताना हळूच तोंड झाकणं
मनाला भुरळ घालतं ग.☺️
तुझं ते लाजणं
लाजताना हाताने डोळे मिटणं
मनाला भुरळ घालतं ग.☺️
तुझं ते रागावणं
रागावताना नाक मुरडणं
मनाला भुरळ घालतं ग.☺️
तुझं ते बोलणं
बोलताना केसांशी चाळा करणं
मनाला भुरळ घालतं ग.☺️
माझं ते तुझ्या प्रेमात गुंतणं
गुणतताना तुझाच विचार येणं
मनाला भुरळ घालतं ग.☺️
– प्रेमा
December 26, 2021 at 7:10 am
क्या बात है, क्या बात है…..
खूपच छान 👍👍👍
December 26, 2021 at 2:27 pm
धन्यवाद दादा.🙏😊
December 26, 2021 at 11:33 am
Hey GP che manogat ahe ka??
Khup masta!
December 26, 2021 at 2:28 pm
हे प्रेमात असणाऱ्या प्रत्येक त्याचे मनोगत आहे.😂😜
धन्यवाद ताई.🙏😊