अडचणीच्या वेळी खचून न जाता

एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम.🥰

 

कोणत्याही परिस्थितीत तोल न ढळू देता

एकमेकांचा आदर करणं म्हणजे प्रेम.😍

 

संकटकाळी कोलमडून न जाता

एकमेकांचा आधार बनणं म्हणजे प्रेम.🥰

 

दुनियादारी बाजूला ठेवून अवघड प्रसंगी

एकमेकांना साथ देणं म्हणजे प्रेम.😍

 

धावपळीच्या जीवनात व्यस्त असूनही

एकमेकांच अवकाश जपणं म्हणजे प्रेम.🥰

 

वेळप्रसंगी स्वतःचा अहंम बाजूला ठेवून

एकमेकांचा मान ठेवणं म्हणजे प्रेम.😍

 

नात्यात कितीही रुसवे फुगवे झाले तरी

एकमेकांना मनवणं म्हणजे प्रेम.🥰

 

अचानक ओढवलेल्या संकटाना तोंड देत

एकमेकांच सांत्वन करणं म्हणजे प्रेम.😍

 

सुख दुःखाच्या प्रसंगी अबोलपणे

एकमेकांना जाणून घेणं म्हणजे प्रेम.🥰

 

प्रेमाचा हवाहवासा सुखद अनुभव घेताना

एकमेकांच्या सहवासात जगाचा विसर पडणं म्हणजे प्रेम.😍

– प्रेम