मला ही स्वस्थ बसू देत नाही आणि समोरच्याला ही निवांत बसू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😀
मला ही निवांत झोपू देत नाही आणि समोरच्याला ही शांत झोपू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😂
मला ही शांत विचार करू देत नाही आणि समोरच्याला ही समाधानी राहू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😇
मला ही समाधानी जगू देत नाही आणि समोरच्याला ही सुखाने राहू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😊
मला ही सुखाची अनुभूती मिळवून देतो आणि समोरच्याला ही विश्वास देतो असा हा प्रेमाचा ऑरा.☺️
मला ही गाढ विश्वास ठेवण्यास भाग पाडतो आणि समोरच्याला ही प्रेमाचा अर्थ समजावतो असा हा प्रेमाचा ऑरा.🥰
मला ही प्रेमात जग विसरण्यास भाग पाडतो आणि समोरच्याचे ही भान हरवतो असा हा प्रेमाचा ऑरा.😘
मला ही स्वभान विसरून प्रेम करण्यास शिकवतो आणि समोरच्याला ही आश्वासक बनवतो असा हा प्रेमाचा ऑरा.😍
– प्रेमा
Leave a Reply