कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे

त्याचा वापर जपून कर पोरी,

जोडीदाराशी भांडण झाले म्हणून

सारखी येऊ नको तू माहेरी.

 

सासरचे पण शेवटी कोणाचे तरी

आई,वडील, बहीण आणि भाऊ,

स्वतःच्या हट्टापायी नसता छळाचा

डाग त्यांच्यावर नको तू लावू.

 

सगळा खेळ संपल्यावर पश्चाताप करून

काहीच फायदा होत नाही ग पोरी,

कोणाचे तरी ऐकुन नको करू ग

तुझ्या सुखी संसाराची राखरांगोळी.

 

कधीतरी चुकत असशील तू ही

आणि कधीतरी चुकत असतील ते ही,

त्या चुकण्याचा गैरफायदा नसतो

घ्यायचा हे लक्षात येऊ दे तुझ्या ही.

 

तुझा सुखी संसार विखरताना पाहून

आमचा जीव तीळ तीळ तुटतो ग पोरी

मनोमन वाटते की, घाईत निर्णय घेऊन

आयुष्यभर रडण्याची वेळ येऊ नये तुझ्यावरी.

 

तुझ्यावर खरचं अन्याय झाला तर

अवश्य या कायद्याचा फायदा करून घे,

पण उगाच कोणाची बदनामी होईल

असे वागणे बरे नव्हे हे ध्यानी असू दे.

– प्रेमा